खेडमध्ये तांब्याच्या तारा लांबविल्या, मोटार रिवायडिंगचे दुकान फोडले

खेडमध्ये तांब्याच्या तारा लांबविल्या, मोटार रिवायडिंगचे दुकान फोडले

Published on

खेड, पुढारी वृत्तसेवा: चोरट्यांनी खेड (ता.कर्जत) राज्यमार्गालगत असलेले जगदंबा इंजिनिअरिंग वर्क्स दुकान फोडून त्यातील अंदाजे 70 हजार किमतीच्या जुन्या, नवीन कृषी पंपाच्या तांब्याच्या तारा लंपास केल्या. ही घटना सोमवारच्या (दि.5) रात्री घडली. दुकान राज्यमार्गालगत आणि वर्दळीच्या ठिकाणी असून, चोरट्यांनी केलेल्या धाडसाचे नवल व्यक्त होत आहे. चोरट्यांनी सर्वप्रथम दुकानाला लावलेल्या शटरच्या कुलूपाचे कोयंडे कापून दुकानात प्रवेश केला.

दुकानात असलेल्या कोणत्याही लोखंडी वस्तूंना हात न लावता फक्त महागड्या तांब्याच्या तारांवर डल्ला मारला. खेड येथील अनेक व्यावसायिक दुकानांमध्ये चोरी होण्याच्या आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत; मात्र संभाव्य पुराव्यांअभावी चोर्‍यांचा तपास लावण्यास कर्जत पोलिसांना अपयश आलेे. चोर्‍या उघड होण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव असल्याने अनेक चोरट्यांचे फावते. दुकानाचे मालक अमोल खराडे, दादा लकडे यांनी याबाबत कर्जत पोलिसात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news