

गडचिरोली पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभरापासून गडचिरोली जिल्ह्याच्या पुर्वेकडील तालुक्यांमध्ये रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे धानपिकाचे नुकसान झाले आहे. २० ते २५ हत्तींचा कळप मागील महिन्यात ओडिशातून छत्तीसगडमार्गे धानोरा तालुक्यात आला. त्यानंतर हा कळप कोरची आणि कुरखेडा तालुक्यात गेला. तेथे धानपिकांची नुकसान केले.
दोन-तीन दिवसांपूर्वी या कळपाने देसाईगंज तालुक्यात प्रवेश केला. काल देसाईगंज तालुक्यातील रावणीवाडी टोली आणि बोडधा गावानजीकच्या तलावात या हत्तींनी जलक्रीडेचा मनमुराद आनंद घेतला. सध्या गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे. अशातच रानटी हत्तींनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. मागील वर्षीदेखील हत्तींचा कळप या जिल्ह्यात आला होता. काही दिवसांनी तो परत गेला. यंदा पुन्हा हत्तींचा कळप जिल्ह्यात आला आहे. नागरिकांनी रानटी हत्तींच्या जवळ जाऊ नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा