Rinku Rajguru : नाकात नथ, केसात गजरा अन् मराठमोळ्या नऊवारीत रिंकूचा नखरा

Rinku Rajguru : नाकात नथ, केसात गजरा अन् मराठमोळ्या नऊवारीत रिंकूचा नखरा
Published on
Updated on

[visual_portfolio id="279109"]

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची. 'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून ती एका रात्रीत प्राकाशझोतात आली. 'सैराट' चित्रपटातच्या यशानंतर तिने कधीचं मागे वळून पाहिले नाही. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. एवढंच नाही तर आर्ची तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर करत असते.

सध्या रिंकूने पोस्ट केलेले काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता तिने परिधान केलेल्या मराठमोळा लूक मधील तिचे फोटो सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

साडीमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरुचे सौंदर्य आणखीचं खुलून दिसत आहे. एकापेक्षा एक फोटोंनी सर्वांचं लक्ष तिने आपल्याकडे वेधून घेत असते. कधी वेस्टर्न तर कधी जीन्समध्ये सर्व प्रकारच्या आऊटफिटमध्ये रिंकूचे कमालीचे सौंदर्य दिसते. आता तिने इंस्टाग्रामवर आपले मराठमोळा लूक मधील काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूने नुकतेच एक नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर अपलोड केले आहे. या फोटोतील नव्या लुकमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे. (Rinku Rajguru)

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रिंकूने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. भरजरी ब्लाऊज तिने परिधान केलेला यामध्ये दिसत आहे. त्यावर तिने सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली आहे. गळ्यात नेकलेस, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर लाल टिकली, नाकात नथ, पायात पैजण असा हा रिंकूचा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. या मराठमोळ्या लूकमध्ये रिंकूचं सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.

तिच्या हा पारंपरिक लूक पाहून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत. काही तासांमध्येच २० हजारांपेक्षा अधिक लोकांनी तिच्या या फोटोंना पसंती दर्शवली आहे. तिचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेष म्हणजे, तिचा सैराट चित्रपटानंतर लूक बदलला आहे. अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या रिंकूला त्या – त्या भूमिकेसाठी स्वत:च्या शरीरयष्टीमध्ये बदल करावा लागला आहे. यासाठी तिने खूप मेहनत घेतलेली दिसते. खूप कष्ट घेऊन तिने आपले वजन कमी केले आहे. (Rinku Rajguru)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news