Republic Day 2024
Latest
Republic Day 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आज संपूर्ण भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी प्रथमच अंमलात आली, ज्याला 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले हे सर्वज्ञात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज शुक्रवारी (दि.२६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांना देशाच्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्य़ा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारत देश हा प्रगतीच्या वाटेवर नवी क्षितिजे पादाक्रांत करत असून त्यात सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस बांधव आणि कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा

