Jio AirFiber Launch : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाँच करणार ‘Jio AirFiber’

Jio AirFiber Launch : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाँच करणार ‘Jio AirFiber’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jio AirFiber Launch : जिओकडून ग्राहकांना मोठी खुशखबर मिळाली आहे. भारतात जिओ एअर फायबर लाँच करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. रिलायन्सच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना, समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. तसेच कंपनीची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा Jio Fiber ने भारतात 10 मिलीयन सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.

अंबानी यांनी फिक्स्ड वायरलेस ब्रॉडबँड (FWB) ऑफर, Jio Air Fiber लाँच करण्याची घोषणा केली. 19 सप्टेंबर रोजी ही सेवा लाँच करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. Jio AirFiber संपूर्ण भारतात 5G नेटवर्क आणि प्रगत वायरलेस तंत्रज्ञान सुविधा देईल.
Jio AirFiber ने गेल्या वर्षी 5G वापरून कोणत्याही वायरशिवाय हवेवर अल्ट्रा-हाय फायबर सारखी गती देण्याची घोषणा केली होती. आज, 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM), Jio Platforms चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, Jio AirFiber 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहुर्तावर लाँच करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने Jio Fiber लाँच करत ग्राहकांना नवीन सेवा दिलेली होती. आता कंपनीकडून ही सेवा आणखी प्रगत करत आता Jio AirFiber देण्यात येणार आहे.

AirFiber आणि JioFiber फरक काय?

Jio ची JioFiber ही ऑप्टिकल फायबर-आधारित ब्रॉडबँड सेवा आहे. या सेवेचा भारतभर 10 दशलक्ष ग्राहक असल्याची माहिती देखील कंपनीने दिली आहे. यामध्ये आणखी सुधारणा करत एअरफायबर (AirFiber) ही वायरलेस सुविधा कंपनीकडून देण्यात येणार आहे. कंपनी म्हणते की, सरासरी, एक कुटुंब दरमहा 280GB डेटा वापरते, जे Jio च्या दरडोई मोबाइल डेटा वापरापेक्षा दहापट जास्त आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news