

पुढारी ऑनलाईन डेस्क : आकाश अंबानी (Akash Ambani) आणि त्याची पत्नी श्लोका (Shloka Ambani-Mehta) यांनी दुसऱ्यांदा आई-वडील बनल्याची खुशखबर दिली आहे. आकाश अंबानी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मुलगी झाल्याची माहिती देत पोस्ट केली आहे.
पृथ्वी आकाश अंबानी असे यांच्या पहिल्या मुलाचे नाव आहे. पृथ्वी अवघ्या दोन वर्षांचा आहे. श्लोका आणि आकाशच्या दुसऱ्या बाळाची गुड न्यूज देणारी पोस्ट त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या दुसऱ्या बाळाच्या आगमनाने संपूर्ण अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. Akash Ambani and Shloka Mehta
आकाश आणि श्लोका हे हायस्कूलपासून एकमेकांना ओळखतात. आकाशने १२ वी असताना श्लोकाला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा संपल्यानंतर आकाशने श्लोकाला प्रपोज केले आणि तिने होकारही दिला. त्यानंतर या दोघांची लव्ह स्टोरी हिट झाली. १२ वीनंतर सुरु झालेल्या आकाश आणि श्लोकाची लव्ह स्टोरी अधिकच घट्ट बनत गेली. पण या लव्ह स्टोरीत एक ट्विस्ट असा होता की, रिलेशनशिपमध्ये येऊनही दोघांनी वेगवेगळ्या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. याचे कारण म्हणजे करिअरवर फोकस करत दोघांनीही घेतलेला हा मोठा निर्णय होता. पण दोघांनी वेगळ्या विद्यापीठात राहूनही आपल्या नात्यात दुरावा ठेवलेला नव्हता.
श्लोकाने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि तिच्या पुढील करिअरला सुरुवात केली. दरम्यान दोघांनी अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांची मार्च २०१८ मध्ये एंगेजमेंट झाली. पुढे डिसेंबर २०१८ मध्ये दोन्ही लव्हबर्ड्स विवाहबंधनात अडकले. त्यानंतर २०२० साली या दोघांनी आई-बाबा होण्याची पहिली खुशखबर दिली. त्यानंतर आता मुलगी झाल्याची त्यांनी दिलेली माहीती. यामुळे अंबानी आणि मेहता कुटंबात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
हेही वाचा