Reel and Brain Fog : सावधान… ‘रिल्स’मुळे वाढतोय ‘ब्रेन फॉग’चा धोका, जाणून घ्‍या याचे दुष्‍परिणाम

Reel and Brain Fog : सावधान… ‘रिल्स’मुळे वाढतोय ‘ब्रेन फॉग’चा धोका, जाणून घ्‍या याचे दुष्‍परिणाम
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढतच चाललेला आहे. समाज माध्यमांवरील विविध ॲप्सवर तरुण-तरुणी रिल्स बनवत असतात, सतत पाहत असता. हे रिल्स पाहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याने ब्रेन फॉग अर्थात मानसिक थकवा जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरूणांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत डॉ. रामदास दातार यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.

सध्या स्मार्टफोनच्या माध्यमातून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटर इत्यादी ॲप्सच्या माध्यमातून सोशल मीडीयाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी तरूण टिक-टॉकद्वारे रिल्स बनवले जात होते. आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रिल्स बनवले जात आहेत. प्रत्येकाला मोफत रिल्स प्रसारित करता येत असल्याने अनेकांनी त्याचा वापर करणे सुरू केला आहे. रिल्स पाहणाऱ्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी हातात मोबाईल आल्यानंतर वेळ जात नसेल किंवा कोणतेही काम नसल्यास रिल्स पाहून आपली करमणूक करून घेणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. (Reel and Brain Fog)

रात्रीचे जागरण वाढले (Reel and Brain Fog)

तरुण मुले, मुली किंवा अनेक नागरिक सुद्धा फेसबुक व्हाट्सअप अन्य माध्यमातून तयार केलेले रिल्स पाण्यात दंग होत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. (Reel and Brain Fog) सार्वजनिक ठिकाणी सुद्धा एकत्रित बसल्यानंतर अनेकांच्या संवाद थांबला आहे. ग्रामीण भागात सुध्दा रिल्स करण्याचे प्रमाण जास्त आहे. रात्री उशिरापर्यंत झोप येत नसल्याने काही जण रिल्स पाहून आपला वेळ घालून करमणूक करत आहेत.

कशी घ्याल काळजी?

१. दिवसा तसेच रात्री शक्य असेल तेवढा मोबाईलचा वापर कमी करावा.
२. स्क्रीन टाईम कमी केल्यास हे ॲटिक्शन बंद होऊ शकते.
३. योग्य वेळी मानसोपचारतज्ज्ञचा सल्ला घ्यावा.

ब्रेन फॉग म्हणजे काय?

मानसिक थकवा येणे यालाच ब्रेन फॉग असे म्हणतात. याबाबत समुपदेशन किंवा औषध उपचार ही बाब कमी होते. यासाठी योग्य वेळी मानसोपचारतज्ज्ञचा सल्ला घ्यावा. झोप न येणे मानसिक थकवा येणे. याशिवाय चिडचिड होणे संवाद कमी होणे. अशा अनेक बाबी रिल्स तसेच स्मार्टफोनची अतिप्रमाणात वापर केल्याने होतात. (Reel and Brain Fog)

रिल्स पाहिल्यामुळे मानसिक ताण वाढतो तसेच मोबाईलचा वापर रात्रीच्या वेळी अति प्रमाणात केल्याने शांत झोप लागत नाही. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. हे लक्षात घेऊन किमान आठ तास झोप होण्यासाठी रात्री मोबाईल उशी जवळ न ठेवता दूर ठेवावा. मोबाईलच्या हार्डिशनमुळे मेंदूवर तसेच झोपेवरही परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीने स्क्रीन टाईम कमी करून मोबाईलचा वापर‌ कमी करावा. आपल्या सवयीचा अनुकरण लहान मुले करतात. त्यामुळे घरातील प्रत्येक लहान मुलांसमोर मोबाईल वापरणे किंवा रिलीज पाहायला धोकादायक ठरु शकतो. अंधारामध्ये अनेक जण मोबाईल पाहत बसतात. यामुळे आजकाल बालपणीच डोळ्याचे आजार उद्भवू लागले आहेत.

– डॉ. किशन देशमुख नेत्र तज्ञ गेवराई

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news