RCB IPL 2023 : फलंदाजी मजबूत, गोलंदाजी कमकुवत; ‘अशी’ आहे RCB ची स्थिती

RCB IPL 2023 : फलंदाजी मजबूत, गोलंदाजी कमकुवत; ‘अशी’ आहे RCB ची स्थिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : RCB IPL 2023 : आयपीएल (TATA IPL 2023)चा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार असून महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पंड्या एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसणार आहेत.

आयपीएलमध्ये सर्व संघ मजबूत आहेत. पण आरसीबीची बाब वेगळी आहे. या संघाकडे एक खास जमेची बाजू आहे ज्याच्या जोरावर ते आयपीएलचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावतील, असे तज्ञांचे मत आहे.

फलंदाजी कशी आहे? (RCB IPL 2023)

आरसीबीच्या फलंदाजी दमदार आहे. या संघात फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका), फिन ऍलन (न्यूझीलंड), विराट कोहली, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक (इंग्लंड) यांचा समावेश आहे. संघाची फलंदाजी टी-20 च्या दृष्टीने योग्य आहे. मात्र, संघाला प्रत्येक सामन्यात पॉवर प्ले च्या 6 षटकांची काळजी घ्यावी लागेल.

यष्टिरक्षक आणि अष्टपैलूची स्थिती

आरसीबीलकडे अनुज रावत, दिनेश कार्तिक हे दोन उत्तम यष्टीरक्षक आहेत. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये वानिंदू हसरंगा (श्रीलंका), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), शाहबाज अहमद, सोनू यादव, मनोज भंडगे यांचा समावेश आहे.

गोलंदाजी कमकुवत (RCB IPL 2023)

संघाची गोलंदाजी कमकुवत असल्याचे दिसते. आकाश दीप, जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया), सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, डेव्हिड विली (इंग्लंड), अविनाश सिंग, राजन कुमार, रीस टोपली (इंग्लंड), हिमांशू शर्मा हे संघात आहेत. चहल सोडून संघाकडे विशेष फिरकीपटू नसल्याने त्यांची गोलंदाजी कमकुवत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (RCB IPL 2023)

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news