RBI Index : आर्थिक वर्ष २०२३; ‘डिजिटल पेमेंट’मध्ये १३.२४ टक्क्यांची लक्षणीय वाढ

RBI- Index
RBI- Index
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : RBI Index : आर्थिक वर्ष २०२३ मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रिझर्वह बँक ऑफ इंडियाच्या (RBI – मध्यवर्ती बँक) पेमेंटस्च्या डिजिटायझेशनसाठीचा डेटाने हे दर्शवले आहे. RBI-DPI हे देशातील पेमेंट डिजिटायझेशनची व्याप्ती कॅप्चर करते. RBI-DPI दाखवते की, मार्च २०२३ चा निर्देशांक सप्टेंबर २०२२ च्या ३७७.४६ पेक्षा ३९५.५८ वर होता. जो ३१ जानेवारी रोजी जाहीर झाला होता. त्यानुसार १३.२४ टक्के वाढ दिसून आली आहे. RBI-DPI ने दर्शविलेल्या निर्देशांकातून हे दिसून आले आहे. बिझनेस टुडेने याचे वृत्त दिले आहे.

यामध्ये म्हटले आहे की, RBI-DPI निर्देशांक सर्व पॅरामीटर्समध्ये वाढला आहे. ज्यामुळे या कालावधीत देशभरातील पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि पेमेंट कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च २०१८ साठी आधार निर्देशांक १०० होता, जो त्यानंतर सतत वाढत गेला. मार्च २०२२ साठी RBI-DPI ३४९.३० होता. मार्च २०२१ मध्ये ते २७०.५९ आणि सप्टेंबर २०२१ मध्ये ३०४.०६ होते.

Economics
Economics

RBI Index : RBI-DPI काय आहे?

RBI (Reserve Bank of India-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने देशभरात किती प्रमाणात पेमेंटचे डिजिटायझेशन केले आहे हे जाणून घेण्यासाठी २०१९-२० साठी सहाव्या द्वि-मासिक चलनविषयक धोरण विधानाचा भाग म्हणून DPI तयार केले. त्याला RBI-DPI असे म्हटले आहे.

या निर्देशांकामध्ये पेमेंट एनेबलर्स, पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर – डिमांड साइड फॅक्टर, पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर – सप्लाय साइड फॅक्टर्स, पेमेंट परफॉर्मन्स आणि कंझ्युमर सेंट्रिसिटी यासह पाच व्यापक पॅरामीटर्स समाविष्ट आहेत. या प्रत्येक पॅरामीटरमध्ये विविध मोजता येण्याजोग्या निर्देशकांचा समावेश असतो. हा RBI-DPI अर्ध-वार्षिक आधारावर चार महिन्यांच्या अंतराने प्रकाशित केले जाते.

RBI Index : २०२६-२७ पर्यंत दररोज १ अब्ज व्यवहारापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा

दरम्यान, अलीकडील PwC इंडियाच्या अहवालात असे म्हटले आहे की युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार २०२६-२७ पर्यंत दररोज १ अब्ज व्यवहारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. UPI ने भारतात डिजिटल पेमेंट चालवण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि २०२२-२३ या कालावधीत किरकोळ विभागातील एकूण व्‍यवहार खंडाच्‍या अंदाजे ७५ टक्के वाटा आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news