रश्मिका मंदान्ना
रश्मिका मंदान्ना

Rashmika Mandanna : Pushpa 2 सेटवरून रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रश्मिका मंदान्ना हिचा Pushpa 2 च्या सेटवरून लाल साडीतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Rashmika Mandanna ) रश्मिकाने या व्हिडिओमध्ये लाल रंगाची साडी नेसलेली दिसते. तसेच तिने दागिनेही घातलेले दिसतात. (Rashmika Mandanna ) रिपोर्टनुसार, हे व्हिडिओ फुटेज आंध्र प्रदेशातील यागंती मंदिराच्या परिसरातील आहेत.

पुष्पा २ हा चित्रपट याचवर्षी म्हणजे २०२३ रोजी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. ॲनिमल या चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका आणखी प्रकाशझोतात आलीय. पुष्पा या चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पा २ मध्ये अल्लु अर्जुनसोबत ती झळकणार आहे. आता पुष्पा २ च्या सेटवरून काही फोटो आणि व्हिडिओ लिक झालेले आहेत. यामध्ये तिने लाल रंगाची साडी, केसात गजरा, दागिने आणि कपाळावर सिंदूर लावलेले दिसत आहे.

या सिक्वलमध्ये रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. तिचे पुष्पाराज सोबत लग्न होते. आणि चित्रपटाची कथा लग्नानंतरच्या जीवनाची असेल.

video – Tej x अकाऊंटवरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news