

तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अतुल बाजीराव पाटील( वय ४२, रा. येडेमच्छिंद्र ता. वाळवा ) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अतुल याने तरुणीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. बलात्काराचे व्हिडिओ शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन अतुल हा तरूणीवर गेल्या दोन वर्षापासून बलात्कार करत होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अतुल पाटील याचे पिडीत तरुणीच्या घरी येणे-जाणे होते. दोन वर्षांपूर्वी अतुल हा तरूणीच्या घरी गेला होता. तरूणी घरात एकटी होती. तरुणीला बिर्याणी खायला दिली. त्यामध्ये त्याने गुंगीचेऔषध मिसळले होते. ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. अतुल याने त्याचे फोटो व व्हिडीओ शूटिंग केले. ते व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने तरुणीच्या घरी, लॉज वरती तिच्यावर वारंवार बलात्कार केला. हा प्रकार दोन वर्षे सुरू होता.
अतुल याच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने हा प्रकार आई- वडिलांना सांगितला. त्यांनी अतुल याला जाब विचारला. त्यावेळी त्याने फोटो-व्हिडीओ वायरल करण्याची, मुलीचे लग्न होवू देणार नाही, अशी धमकी तरूणीच्या आई – वडिलांना दिली.