Deepika Padukone
Deepika Padukone

Deepika Padukone Singham Again look : रणवीर सिंहने शेअर केला दीपिकाचा ‘शेरनी’ लूक

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपुर्वी दीपिका पदुकोणचा सिंघम अगेन चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो व्हायरल झाले होते.(Deepika Padukone Singham Again look ) आता दीपिकाचा नवा लूक व्हायरल होतोय. सिंघम अगेन या चित्रपटातील दीपिकाचा नवा लूक तिचा पती आणि रणवीर सिंहने शेअर केला आहे. एक्स अकाऊंटवर त्याचे स्क्रिन शॉट व्हायरल होताना दिसत आहेत. रणवीरने आपल्या इन्स्टास्टोरीवर स्नॅपशॉट शेअर केला असून त्याने सिंहिणीचा एक इमोजी शेअर करत शेरनी असे लिहिलेले दिसते. (Deepika Padukone Singham Again look )

Deepika Padukone
Deepika Padukone

दोन दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने सिंघम अगेनचे नवे पोस्टर शेअर केले. या पोस्टरमध्ये दीपिका दुकोण सिंघम अजय देवगन प्रमाणे पंजे वाला पोझ करताना दिसत आहे. हा पोस्टर शेअर करत रोहित शेट्टीने लिहिलं, 'माझी हिरो…रीलमध्येही आणि रियलमध्येही. लेडी सिंघम दीपिका पादुकोण.'

या पोस्टरमध्ये दीपिका पादुकोण पोलिस वर्दीमध्ये दिसते. तिने गॉगलघातला असून सिंघमची युनिक पोझ करताना दिसते. दीपिका पादुकोणच्या या फोटोवर खूप कॉमेंट्स येत आहेत. एका फॅनने लिहिलं, हे पाहणं गरजेचं आहे. पोलिस युनिफॉर्ममध्ये दीपिका पादुकोण शक्तीशाली दिसत आहे. तर आणखी एका फॅनने लिहिलं की, शक्ती शेट्टीसाठी आणखी प्रतीक्षा नको.

सिंघम अगेनमध्ये अजय देवगन, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news