या व्हीडियोत नक्की असं काय घडलं की रणवीर सिंगला नेटीझन्स म्हणू लागले ‘ड्रामा क्वीन’

या व्हीडियोत नक्की असं काय घडलं की रणवीर सिंगला नेटीझन्स म्हणू लागले ‘ड्रामा क्वीन’
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणवीर सिंग हा अतरंगी अभिनेता या ना त्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. कधी हटके ड्रेस सेन्स, कधी पत्नी दीपिकासोबत घटस्फोटाच्या चर्चेने तर कधी अतरंगी वागण्यामुळे. त्याच्या या सगळ्या कृतींवर नेटीझन्सची उलट– सुलट चर्चा होत असते. पण आता सध्या एका हटके कारणासाठी रणवीर चर्चेत आहे.

रणवीर अलीकडेच फिल्मफेअर मिडल ईस्ट सोहळ्यात दिसला होता. या अवॉर्ड सोहळ्यात त्याला सर्वोत्तम अभिनेत्यासाठीचा अवॉर्ड मिळाला. या दरम्यान त्याने एक भाषणही केलं. अवॉर्ड घेण्यासाठी जात असताना तो आई– वडिलांच्या तसेच पहिल्या रांगेत बसलेल्या हेमामालिनी आणि गोविंदाच्याही पाया पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by News Waker (@newswaker)

यावेळी अवॉर्ड घेतल्यानंतर त्याने एक भावनिक भाषण केलं. यादरम्यान त्याला अश्रु अनावर झाले. या भाषणात त्याने त्याचा संघर्ष आणि आई– वडिलांच्या सपोर्टबाबतही बोलला. पण त्याचा हे वागणं नेटीझन्सच्या पचनी पडलेलं दिसत नाही. हा व्हीडियो व्हायरल होताच तो ट्रोलही होतो आहे. एकाने कमेंटमध्ये म्हटल आहे की ' थोडं तरी नॉर्मल वाग, ड्रामा क्वीन' , तर एकाने 'इसका ओव्हर अॅक्टिंग का 50 रुपया काट म्हणत रणवीरची चांगलीच खिल्ली उडवली आहे. तर याला सगळीकडे रडायचं असतं अशीही एकाने कमेंट केली आहे.

रणवीर आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत न्यु मॉम आलिया भट दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news