reshma shinde
reshma shinde

Reshma Shinde : नाकात नथ, कंठहार मस्त…रेश्माच्या मराठमोळ्या लूकवर सगळेच फिदा

Published on

पुढारी ऑनलाईन : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने या मालिकेतून रेश्मा शिंदे घराघरात पोहोचली. अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. या मालिकेत तिने दीपा ही व्यक्तीरेखा साकारलीय. तिला या मालिकेत सावळ्या रंगाची दाखवण्यात आलीय. रेश्माने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. तिनं नांदा सौख्य भरे या मालिकेत काम केलं आहे. तिने केसरी नंदन मालिकेत भूमिका साकारली होती. पण, खऱ्या आयुष्यात रेश्मा वेगळी आहे.

रेश्मा रिअल लाईफमध्ये सुंदर दिसते. ती ग्लॅमरसदेखील आहे. अनेक दिवसांनंतर रेश्माने एक नवा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा साजशृंगार दिसतोय. नाकात नथ, केसात फुल, केसांचा अंबाडा, गळ्यात हार, कानात झुमके, हातात बांगड्या, हातात अंगठी आणि छान मेकअप असा तिचा लूक पाहण्यासारखा आहे. हा फोटो शेअर करताना तिने Adorn yourself with shyness and armour yourself with Royalty?❤️? अशी कॅप्शन लिहिली आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेनंतर तिचे फॅन फॉलोईंगदेखील खूप वाढले आहे. या मालिकेत तिच्यासोबत आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर, अनघा भागरे, अभिज्ञा भावे, विदिशा म्हसकर, साईसा भोईर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रेश्माने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. रेश्मा तिच्या दीपा पात्रामुळे लोकप्रिय झाली. रेश्मा सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह असते. ती आपल्या मैत्रींणीसोबत धमाल करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Birari (@biraripooja)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news