राम मंदिराचे काम ४० टक्‍के पूर्ण, गर्भगृह ‘या’ वर्षापासून हाेणार भक्तांसाठी खुले

राम मंदिराचे काम ४० टक्‍के पूर्ण, गर्भगृह ‘या’ वर्षापासून हाेणार भक्तांसाठी खुले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी केल्यानंतर आता दोन वर्षांच्‍या कालावधीत मंदिराच्या बांधकाम ४० टक्के पूर्ण झाले आहे. मंदिराचा पहिला मजला २०२४ च्या सुरुवातीला तयार होईल, अशी अपेक्षा आहे. "आम्ही एकाच वेळी 'गर्भ गृह' किंवा गर्भगृह परिसरातून प्रत्यक्ष मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे. मंदिराच्या भिंतींसाठी राजस्थानातील गुलाबी वाळूचा दगड वापरला जात आहे," अशी माहिती मुख्य अभियंते जगदीश यांनी दिली. रामजन्मभूमी ट्रस्टने पाच पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे. जगदीश हे त्यापैकी एक असून, बांधकाम साईटवर एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

बांधकाम साइट माध्यमांसाठी खुली करण्यात आली. प्लिंथमध्ये वापरलेले मोठे दगड मोठ्या क्रेनने उचलले जात असल्याचे दिसत आहे. दूरवर वाळूच्या दगडाचे कामही दिसत होते. उत्पल या अभियंत्याने "साइटवर काम करणे ही अभिमानाची बाब आहे," असे म्हटले आहे.

या वर्षी जूनमध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'गर्भ गृह' किंवा मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी करण्याच्या समारंभात त्यात पहिला कोरीव दगड ठेवून भाग घेतला. 2024 पर्यंत गर्भगृह भक्तांसाठी खुले होईल, असे जगदीश यांनी सांगितले.

मंदिराच्या बांधकामाचे प्रभारी रामजन्मभूमी ट्रस्टने एका निवेदनात म्हटले आहे की, गर्भगृहात राजस्थानच्या मकराना डोंगरावरील पांढरे संगमरवरी वापरण्यात येणार आहेत. मंदिर ट्रस्टने सांगितले की, मंदिराच्या प्रकल्पासाठी वापरल्या जाणार्‍या एकूण दगडांमध्ये 8 ते 9 लाख घनफूट कोरीव वाळूचा दगड, 6.37 लाख घनफूट न कोरलेला ग्रॅनाइट, 4.70 लाख घनफूट कोरीव गुलाबी वाळूचा दगड आणि 13,300 घनफूट मकराना पांढरा कोरीव संगमरवर यांचा समावेश आहे, असेही मुख्य अभियंते जगदीश यांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news