Rakhi Sawant :आदिलने अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय; राखीच्या भावाचा खुलासा

rakhi brother and adil khan
rakhi brother and adil khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी सावंत (Rakhi Sawant) ने तिचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) वर गंभीर आरोप केल्यानंतर रोज एक नवे खुलासे समोर येत आहेत. आपल्या पतीविरोधात तिने पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालय़ीन कोठडी सुनावण्यात आली. इतकचं नाही तर राखीने हेदेखील सांगितलं की, ती आता घटस्फोट घेईल. राखीचा भाऊ राकेशनेदेखील आदिलवर आरोप केले आहेत. (Rakhi Sawant)

राखी सावंतच्या भावाने मीडियाशी बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले. आदिल खान आधीपासून विवाहित आहे. त्याने अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आदिलवर पैसे आणि गाडी चोरी करण्याचेदेखील आरोप आहेत. राखीचे समर्थन करत राकेश म्हणाला की, 'राखी ड्रामा क्वीन नाही. आज तिच्यासाठी हे दिवस खूप आव्हानात्मक आहे. तिला समजलं की, आदिल आधीपासून विवाहित आहे.'

आदिलच्या आईचा आला फोन

राखी सावंतने मीडियाशी बातचीत केली. आदिलच्या आईचा आणि आंटीचा कॉल आला होता. आई सात महिन्यांपासून बोलत आहे की, 'बच्चा है, ये बच्चा है'. ३० वर्षांचा असा अत्याचार करू शकतो. परंतु, त्यांच्या म्हणण्यावर नेहमी आदिलला माफ केलं.'

राखीचा एक्स पती काय म्हणाला?

याप्रकरणी राखीचा एक्स पती रितेश (Ritesh Raj) म्हणाला की, त्याला या सर्व गोष्टी आधीपासून माहिती होत्या. रितेशने राखी आणि आदिलच्या मुद्द्यावरून इन्स्टाग्रामवर लाईव्ह केलं होतं. राखीने ३ महिन्यांपूर्वीच आपलं दु:ख सांगितलं होतं.

video-viralbhayani insta वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news