

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुमच्या पायाखालची जमीन निसटून चालली आहे. याची तुम्हाला जाणीव आहे का? जमिनी विकल्याचा तुम्हाला व्यवस्थित मोबादला दिला आहे का? तुमच्याकडे जर तुमची हक्काची जमीन नसेल तर पुढील पिढीचं काय? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिकांना केला. त्यामुळे मी केवळ बोलणार आणि तुम्ही ऐकणार असं नाही तर, आपल्यावर होणाऱ्या आक्रमणाबाबत मला तुमच्याशी चर्चा करायची आहे, असेही ठाकरे म्हणाले. ते आज अलिबागमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. (Raj Thackeray)
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, मराठी माणसाने मोठ्या प्रमाणात स्वत:च्या हक्काच्या जमिनी विकल्या आहेत. यामुळे पुणे, नाशिक, ठाणे आणि मुंबईची वाट आज लागली आहे. जर तुमच्या हक्काची जमीन नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीचं काय याचा तुम्ही विचार केला आहे का? असा सवाल देखील ठाकरे यांनी अलिबागमधील नागरिकांना केला आहे. (Raj Thackeray)
महाराष्ट्रातील लोकांना भानच राहिलेलं नाही. तुमच्याकडे तुमची हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेच नागरिक नाही. मोठमोठ्या प्रकल्पातून तुमच्या जमिनी बळकावल्या जातायेत. आज नरेळ, माथेरान पायथ्याच्या गृहप्रकल्पात परप्रांतीयांची घरकुलं आहेत. यासाठी मनसे कार्यकत्यांनी सतर्क राहिले पाहिजे, असे देखील आवाहन ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना बोलताना केले आहे. (Raj Thackeray
महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते आजकाल ओरबडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. आज दुर्लक्ष कराल, उद्या माझ्यावर विश्वास ठेवाल. तुम्हाला धोका सांगतोय आताच सावध व्हा. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. आपण आपल्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत. असेदेखील राज यांनी राज्यातील नागरिकांना सावधतेचा जमीन धारकांना इशारा दिला आहे.