पुरोहित वर्गाकडून राज ठाकरे यांचे पुण्यात स्वागत, औरंगाबादच्या सभेसाठी दिल्या शुभेच्छा

पुरोहित वर्गाकडून राज ठाकरे यांचे पुण्यात स्वागत, औरंगाबादच्या सभेसाठी दिल्या शुभेच्छा
Published on: 
Updated on: 

पुणे; पुढारी वृतसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील पुरोहित वर्गाने स्वागत करून पुढील वाटचालीसाठी त्यांना आशीर्वाद दिले. तर औरंगाबादच्या सभेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पुरोहित यांनी राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी शंखनाद करून शांती मंत्राचे पठण केले. मनसेकडून पुण्यात राज ठाकरेंचे हार, शाल आणि फोटो प्रेम देवून स्वागत भव्य करण्यात आले. त्यात कार्यकर्त्यांसह आता पुरोहितवर्गही पुढे आला आहे. राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादसाठी आज शनिवारी (दि.३०) रोजी रवाना झाले.

राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे आधीच हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरीमधील सर्व पुरोहित राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते. वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करून राज ठाकरे औरंगाबादकडे मार्गस्थ होणार आहेत.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आत्मे एकत्र आलेत – संजय राऊत यांची टीका 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news