Rainfall Forecast: उष्णतेच्या लाटेसह राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा अंदाज
पुढारी ऑनलाईन डेस्क: काल शुक्रवार (दि.५ एप्रिल) आणि आज (दि.६ एप्रिल) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागात पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता देखील भारीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती पुणे विगाचे विभागप्रमुख डॉ.के एस होसाळीकर यांनी एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत दिली आहे. (Rainfall Forecast)
हवामान शास्त्रज्ञ डॉ. होसाळीकर एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात रविवारी (दि.७) ते बुधवार (दि.१०) एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, याठिकाणी गारपीटीची शक्यता आहे, असे देखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटले आहे. (Rainfall Forecast)
Rainfall Forecast: विदर्भातील काही जिह्यांमध्ये गारपीट
राज्यातील मध्य महाराष्ट्र , उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांशी जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे. या भागात पुढील तीन ते चार दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची आहे. तसेच विदर्भातील काही जिह्यांमध्ये गारपीटीची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (Rainfall Forecast)
मध्य-दक्षिण द्विपकल्पावरील 'या' राज्यात अवकाळीची शक्यता
ईशान्य भारतासह पश्चिम हिमालयातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या विस्तारित पावसाची शक्यता आहे. तर काही भागात हिमवृष्टी देखील होऊ शकते. भारतीय मध्य आणि दक्षिण द्विपकल्पीय प्रदेशात देखील काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, पदुच्चेरी केरळ, आंध्रप्रदेश, यमेन या राज्यात देखील पावसाची शक्यता आहे.

