

पुणे : 'झुक झुक आगीनगाडी…पाहूया मामाच्या गावाला जाऊया…' हे बालगीत लहानपणी अनेकांनी गायलेले असते. सध्या रेल्वेमध्ये अनेक बदल होत आहेत… ती आधुनिक व वेगवान बनली आहे.
मात्र, प्रत्यक्षात रेल्वे कशी तयार होते, तिची अंतर्गत तांत्रिक यंत्रणा, ब्रेक कसे लागतात, याबाबत आपल्याला नेहमीच कुतूहल असते. बच्चे कंपनीलाही याबाबत नाना प्रश्न पडतात.याची उत्तरे मिळवण्यासाठी पालकांनी बच्चे कंपनीला घोरपडी यार्डातील उद्यानाची सफर घडवून आणायला हवी.