

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी सध्या आसाममध्ये आहेत. आसाममध्ये संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान बटाद्रवा थान येथे मंदिरात जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. मंदिर समितीने मात्र त्यांना दुपारी ३ नंतर भेट देण्यास सांगितले आहे. या प्रकरणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. (Nana Patole)