Rahul Gandhi : भाजप, आरएसएसला कुटुंब म्हणजे काय हे समजणार नाही: राहुल गांधी

rahul gandhi
rahul gandhi
Published on
Updated on

वायनाड, पुढारी ऑनलाईन : भाजप आणि आरएसएसला कुटुंब म्हणजे काय हे समजणार नाही. भाजप जितके जास्त तुम्हाला आणि मला वेगळे करण्याचा प्रयत्न करील तितके आम्ही जवळ येऊ. त्यांना असे वाटत की जर आम्ही राहुल गांधींना अपात्र ठरवले, तर त्यांचे वायनाडशी असलेले नाते तुटेल. परंतु माझे आणि वायनाडशी असलेले नाते आणखी घट्ट होईल, असा पलटवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केला. (Rahul Gandhi)

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) १२-१३ ऑगस्ट दरम्यान केरळमधील त्यांच्या वायनाड मतदारसंघाचा दौऱ्यावर आले आहेत. लोकसभा खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतरचा त्यांचा वायनाडचा हा पहिला दौरा आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात केरळ काँग्रेसतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र मोदी आडनाव मानहानी प्रकरणात सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आधार गांधी यांच्यासमोर राहिला होता. अखेर गत आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदा वायनाडच्या दौऱ्यावर आले आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news