

पुढारी ऑनलाईन: ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 6 असतो . या राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. रॅडिक्स क्रमांक 6 असलेले लोक शुक्राच्या प्रभावाखाली सुंदर आणि प्रभावशाली असतात. या मूलांकाच्या स्त्रिया अतिशय सुंदर असतात. हे लोक कलाप्रेमी असतात. तसेच त्यांना एकत्र राहायला खूप आवडतं. ते त्यांच्या जीवनाचा मुक्तपणे आनंद घेतात. ते विश्वासार्ह आणि शांतताप्रिय असतात. ते सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात.
मूलांक 6 असलेले लोक दीर्घायुषी, निरोगी, बलवान, आनंदी असतात. इतरांना संमोहित करण्याचा गुण त्यांच्यात असतो. ते मनाने उदार आणि नैतिक असतात. या मूलांकाचे लोक सामान्यतः श्रीमंत असतात. त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते. त्यांना राजे-महाराजांसारखे जीवन जगायला आवडते. ते कठोर परिश्रमाने काहीही साध्य करू शकतात. सौंदर्य ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. ते लगेच सौंदर्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता असते.
मूलांक क्रमांक 6 असलेल्या लोकांना महागडे आणि ब्रँडेड कपडे घालण्याची आवड असते. या मूलांकाच्या लोकांमध्ये इतरांना आकर्षित करण्याचा जितका गुण असतो तितका कोणत्याही मूलांकात नसतो. त्यांच्या लव्ह लाईफमध्ये नेहमीच अडचणी येतात. हे लोक नवीन योजनांमधून पैसे कमावतात. मेहनतीच्या जोरावर त्यांना चांगले शिक्षण मिळते. त्यांना संगीत आणि चित्रकलेची विशेष आवड असते
मूलांक 6 असलेले लोक संगीत, कला, हॉटेल, संगणक इत्यादींशी संबंधित चांगले काम करू शकतात. याशिवाय चित्रपट, नाटक, सोने, चांदी, हिरा इत्यादींशी निगडित काम आणि भोजनाशी संबंधित काम करणेही त्यांच्यासाठी शुभ राहील. कपड्यांचा व्यवसाय करणे देखील तुमच्यासाठी चांगले सिद्ध होऊ शकते.
डिस्क्लेमर: येथे प्रस्तुत केलेली माहिती केवळ गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, pudhari.news कोणत्याही प्रकारच्या विश्वासाला, माहितीला दुजोरा देत नाही. कोणतीही माहिती किंवा गृहितक लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.