Queen Elizabeth-II Death : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

Queen Elizabeth-II dealth
Queen Elizabeth-II dealth
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुरूवारी रात्री (८ सप्टेंबर) ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. बकिंगहॅम पॅलेस येथून मिळालेल्या माहितीनूसार स्कॉटलँड येथे बाल्मोरल कॅसल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.  (Queen Elizabeth-II Dealth)

२१ एप्रिल १९२६ रोजी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म झाला.  २ जून 1953 मध्ये त्या ब्रिटनची राणी बनल्या. १९२६ ते २०२२ असा त्यांचा कार्यकाळ राहीला. राणीच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स हा ब्रिटनचा सम्राट बनेल.

जूनमध्ये एका कार्यक्रमादरम्यानचे  हे छायाचित्र

राणी एलिझाबेथ यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स, यांची सून कॅमिला, नातू विलियम्स हे उपचारावेळी त्यांच्याजवळ होते. राणी काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांना Episodic Mobility हा आजार असून वयोमानानूसार त्यांना या आजाराचा त्रास होत असल्याचे सांगितले जात होते. राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांना फेब्रुवारी मध्ये कोरोना देखील झालेला होता. (Queen Elizabeth-II Dealth)

राणीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर ब्रिटनच्या नवनियुक्त पंतप्रधान लीझ ट्रस यांनी ट्विटवरचे बदलेले प्रोफाईल 

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधन वार्ताने धक्का पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले. एलिझाबेथ II या आपल्या काळातील एक महान शासक म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशासाठी आणि जनतेसाठी प्रेरणादायी नेतृत्व केले आहे. तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सन्मान आणि शालीनता यापासून शिकवण घेण्याइतकं चांगलं कार्य होतं. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांशी आणि ब्रिटनच्या लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत.

पीएम मोदी म्हणाले, "२०१५ आणि २०१८ मध्ये युकेच्या दौऱ्यादरम्यान मी राणी एलिझाबेथ द्वितीय यांना भेटलो. मी त्यांचा प्रेमळपणा आणि दयाळूपणा कधीही विसरणार नाही. एका भेटीदरम्यान त्यांनी मला एक रुमाल दाखवला, जो महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नामध्ये भेट दिलेला होता.

स्कॉटलँडच्या बाल्मोरल कॅसल येथे तैनात केलेले सुरक्षा रक्षक

पंतप्रधान लीझ ट्रस यांनी ट्विट करून राणीविषयी व्यक्त केलं प्रेम

ब्रिटनच्या नवनियुक्त पंतप्रधान लिज ट्रस यांनी राणीच्या मृत्यूनंतर शोक करत ट्विट केले. या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, बकिंगहॅम पॅलेस येथून मिळालेल्या माहितीनूसार संपूर्ण देशाला राणींच्या प्रकृतीबाबत चिंता लागून राहीली होती. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी दु:ख झाल्याची भावना व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राणी एलिझाबेथ यांची भेट घेऊन पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

दोनच दिवसांपूर्वी (६ सप्टेंबर २०२२) भेटण्यासाठी गेलेल्या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस त्यांचा शपथविधी सोहळ्यादिवशी टिपलेले हे छायाचित्र 

२० ऑक्टोबर २००३ रोजी द.आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना भेटल्यानंतर राणी एलिझाबेथ यांचे टिपलेले छायाचित्र

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news