

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. पुण्यात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची एकच धावपळ उडाली. पुणेसह कोल्हापूर, सातारा, नंदुरबारसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत.
पुणे शहरात सायंकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. डेक्कन, कोथरूड, औंध, पुणे विद्यापीठ परिसरात पाऊस झाला. अचानक आलेल्या पाऊसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. यानंतर पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.