

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
'कोरोनाची लक्षणे जाणवल्यावर आरटीपीसीआर चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थीर असून, संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चचणी करून घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन', असे त्यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.