

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आगामी आठवड्यात शहरात ढगाळ वातावरण राहणार असून, किमान तापमानात वाढ तर कमाल तापमानात घट होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
उत्तर भारतातून येत असलेल्या गार व बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वाऱ्याची टक्कर महाराष्ट्रात होत असल्याने गार हवा, ढगाळ वातावरण अन् काही भागात हलका पाऊस असे वातावरण राहील. पुणे शहरात 23 ते 27 जानेवारीदरम्यान असे वातावरण राहील. सध्या शहरात रात्री व पहाटे थंडी जाणवत असून, किमान तापमान 11.8 अंशांवर आहे. त्यात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.