

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यामध्ये प्रॉपर्टी आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील मोठ्या संख्येने पर्याय पुढारी प्रॉपर्टी शो आणि ऑटो एक्सपोमध्ये ग्राहकांना उपलब्ध होत आहेत. पुण्यातील ग्राहकांना ही संधी 'दैनिक पुढारी'ने उपलब्ध करून दिली आहे. या एक्सपोमध्ये ऑटो आणि प्रॉपर्टीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. जवळपास 13 स्टॉल हे ऑटो विभागतील आहेत आणि तितकेच पर्याय हे प्रॉपर्टी विभागात आहेत. एका शानदार सोहळ्यात या प्रॉपर्टी शो आणि ऑटो एक्सपोचे आज उद्घाटन पार पडले.
पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन माननीय डॉ.योगेश जाधव, क्रेडाई पुणे मेट्रोचे प्रेसिडेंट रणजीत नाईकनवरे, मराठी बांधकाम व्यावसायिक असो. पुणेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घाटे, सहगल ऑटो रायडर्सचे सीईओ भारत वझे, बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रसंता दास, बँक ऑफ महाराष्ट्राच्या चीफ मॅनेजर मालिनी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रॉपर्टी शो आणि ऑटो एक्सपोचे उद्घाटन झाले. तुम्हीही तुमच्या नवीन वास्तुच्या किंवा नव्या कारच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ब्रॅंडसच्या शोधात असाल तर पुढारी प्रॉपर्टी शो आणि ऑटो एक्सपो हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
पुढारी प्रॉपर्टी शो आणि ऑटो एक्सपोला या कारणांसाठी भेट द्या..
तुम्हीही तुमच्या नवीन वास्तुच्या किंवा नव्या कारच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ब्रॅंडसच्या शोधात असाल तर पुढारी प्रॉपर्टी शो आणि ऑटो एक्सपो हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
प्रॉपर्टी शो आणि ऑटो एक्सपोची वेळ : 10 सप्टेंबर 2023 , सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत
प्रॉपर्टी शो आणि ऑटो एक्सपोचे ठिकाण : महालक्ष्मी लॉन्स, डी पी रोड, राजाराम पुलाजवळ, पुणे