वाचकांसाठी बक्षिसांचा धमाका; आजपासून योजनेला भव्य प्रारंभ

वाचकांसाठी बक्षिसांचा धमाका; आजपासून योजनेला भव्य प्रारंभ
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वाचकांच्या मनावर गेली 75 वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे दैनिक 'पुढारी' कोल्हापूर शहर व शहर आवृत्ती असणार्‍या गावांतील वाचकांना नववर्षाची अनोखी भेट देणार आहे. शहरातील वाचकांवर दोन कोटी रुपयांच्या तब्बल 50 हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. या योजनेत आठ महिन्यांतच दोन हमखास बक्षिसांसह लकी ड्रॉमार्फत आणखी दोन बक्षिसे जिंकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. या योजनेचा शुक्रवारी (दि. 5) प्रारंभ होत आहे. या योजनेचे कूपन आजपासून दररोज प्रसिद्ध होणार आहे.

पत्रकारिता आणि सार्वजनिक क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केलेला दैनिक 'पुढारी' म्हणजे वाचकांचा आधारस्तंभच आहे. वाचकांच्या समस्यांना वाचा फोडत, त्यांना न्याय देण्यात दै. 'पुढारी' सातत्याने आग्रही आणि अग्रणी राहिला आहे. भक्कमपणे सोबत उभा राहिलेल्या 'पुढारी'मुळे शहरावरील अन्यायी टोलचे भूत गाडण्यात कोल्हापूरवासीयांना यश आले. शहराच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 'पुढारी'ने वाचकांच्या भूमिकेला बळ देत, ते प्रश्न तडीस नेण्याचे प्रयत्न केले. यातूनच वाचक आणि 'पुढारी'चे असलेले अतूट नाते दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे.

वाचकांच्या प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक लढ्यात सोबत असणारा 'पुढारी' वाचकांनाही भरभरून देण्यात नेहमीच पुढे राहिला आहे. त्यातूनच 'पुढारी' परिवाराने शहरातील वाचकांसाठी 'न्यू इयर डबल धमाका हमखास बक्षीस योजना' आणली आहे. या योजनेंतर्गत कोल्हापूर शहरातील वाचकांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

या योजनेत सहभागी होण्यासाठी वाचकांना कोणत्याही प्रकारचे बुकिंग करण्याची, त्याकरिता आगाऊ रक्कम भरण्याची गरज नाही. केवळ दररोज प्रसिद्ध होणारा दैनिक 'पुढारी' आपल्या घरी असणे आवश्यक आहे.

दोन वर्षे नाही, तर केवळ आठ महिन्यांतच दोन हमखास बक्षिसे

या योजनेच्या बक्षिसांसाठी एक-दोन वर्षे वाट पाहायची गरज नाही. केवळ आठ महिन्यांत दोन हमखास बक्षिसे वाचकांना मिळणार आहेत. त्यासह दोन लकी ड्रॉमधूनही आणखी दोन बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी 8805025353 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आठ महिन्यांंत दोन हमखास बक्षिसे मिळणार

या योजनेतील सहभागी प्रत्येक वाचकाला आठ महिन्यांत दोन हमखास बक्षिसे मिळणार आहेत. पहिल्या लकी ड्रॉदरम्यान बाथरूम सेट व दुसर्‍या लकी ड्रॉदरम्यान सहभागी सर्वच वाचकांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. यासह पहिल्या आणि दुसर्‍या लकी ड्रॉमध्ये आणखी बक्षीस जिंकण्याची संधी आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी हे करा

या योजनेत सहभागी होण्यासाठी वाचकांनी जवळच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे आपली मागणी नोंद करावी. दैनिक 'पुढारी'तून 5 जानेवारी 2024 पासून दैनंदिन कूपन प्रसिद्ध होईल. ती आज प्रसिद्ध होणार्‍या तक्त्यावर चिकटवून द्यावीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news