Popcorn brain : सोशल मीडियामुळे उद्भवतेय ‘पॉपकॉर्न ब्रेन’ची समस्या!

Popcorn brain
Popcorn brain
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आपण एखाद्या टास्कवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नसलो, तर हे कदाचित 'पॉपकॉर्न ब्रेन' Popcorn brainचे लक्षण असू शकते, असा इशारा एका नव्या अभ्यासातून देण्यात आला आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर एकाग्रतेवर किती विपरीत परिणाम करत आहे, याचा दाखला यातून मिळत आला आहे. 'पॉपकॉर्न ब्रेन' मनोविज्ञानातील एक संज्ञा असून डिजिटल जगातील मल्टिटास्किंग व स्क्रोलिंगमुळे एकाग्रता सातत्याने भंग पावत राहते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

यूडब्ल्यू आयस्कूलचे संशोधक डेव्हिड लेवी यांनी 'पॉपकॉर्न ब्रेन' Popcorn brain असे याचे नाव 2011 मध्ये दिले होते आणि तेच आताही प्रचलित आहे. डिजिटल जगातील अतिरेकामुळे आपले मन पॉपकॉर्नप्रमाणे इकडेतिकडे भटकत राहते आणि जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन राहण्याच्या सवयीमुळे पॉपकॉर्न ब्रेन ही सर्वसामान्य समस्या ठरत चालली असल्याचे चित्र आहे. मोबाईल फोन, संगणक, लॅपटॉप व सोशल मीडियाच्या अति वापरामुळे याचा आपल्या मेंदूवर विपरित परिणाम होत असल्याचे आजवर अनेक अभ्यासातून आढळून आले. त्याचीच पुनरावृत्ती आताही झाली आहे.

मानसोपचार तज्ज्ञ डॅनिएल हेग यांनी केलेल्या निरीक्षणानुसार, 'पॉपकॉर्न ब्रेन' Popcorn brain समस्येमुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. यामुळे नव्या बाबी आत्मसात करणे आणि स्मरणशक्तीवर देखील याचा नकारात्मक परिणाम होतो. पॉपकॉर्न ब्रेनची समस्या उदभवू नये आणि असल्यास ती कमी व्हावी, यासाठी तज्ज्ञांनी काही उपायदेखील सुचवले आहेत. यात सिंगल टास्किंग अर्थात एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवण्याचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय, वेळोवेळी डिजिटल डिटॉक्स करावे, डिजिटल डिव्हॉईस शक्य तितके दूर ठेवावेत, वाचन-व्यायामासाठी वेळ द्यावा आणि रोज 10 मिनिटे न चुकता ध्यानधारणा करावी, असेही उपाय यावेळी सुचवले गेले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news