

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी नोटीस बजावली आहे. गांधी यांनी २० ऑक्टोबर रोजी राजस्थानातील ढौसा येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत. प्रियांका सभेत म्हणाल्या की, मी टीव्ही पाहत होते. पंतप्रधान मोदी यांनी देवनारायण मंदिराच्या हुंडीत एक पाकीट टाकले होते. पाकिटात काय आहे, याची लोकांना उत्सुकता होती. मंदिर व्यवस्थापनाने ते पाकीट उघडल्यानंतर त्यात केवळ २१ रुपये आढळले.(Priyanka Gandhi)