Latest
नगर ग्रामपंचायत Live : प्रतिष्ठेच्या ठरलेल्या काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतापसिंह बबनराव पाचपुते पराभूत
श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणाला भाऊबंदकी नवीन नाही. पण आता हे टशन काष्टीकरांनी ग्रामपंचायत निवडणुकीतही पाहायला मिळालं. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह पाचपुते यांच्या विरोधात घरातूनच उमेदवार उभा होता. बबनराव पाचपुतेंचे बंधू स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते निवडणुकीच्या रिंगणात होते. आता जनतेने साजन यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे.

