Prajakta Koli चा साखरपुडा, आता ‘तो’ एक्स बॉयफ्रेंड…
पुढारी ऑनलाईन डेस्क : जुगजुग जियो फेम अभिनेत्री प्राजक्ता कोलीने तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालशी साखरपुडा केला केला आहे. लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड वृषांक खनालला ती डेट करत होती. (Prajakta Koli ) आता प्राजक्ताने सोशल मीडियावर साखरपुड्याची माहिती देत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती इंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करतना दिसतेय. प्राजक्ता एक अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूब स्टार आहे. (Prajakta Koli )
प्राजक्ताने 'मिसमॅच्ड' आणि 'प्रीटी फिट' यासारख्या वेबसीरीजमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा प्रसिद्ध असा चित्रपट 'जुग जुग जियो'मध्ये ती वरुण धवनसोबत दिसली होती. विद्या बालनसोबत ती 'नियत' में भी नजर आई हैं. यामध्ये तिने वरुण धवनच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
वृषांक खनालला म्हटलं एक्स बॉयफ्रेंड
प्राजक्ता कोलीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एंगेजमेंटची गुड न्यूज आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. तिने वृषांक खनालसोबत एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केलाय. या फोटो पोस्टमध्ये तिने लिहिलंय- 'आता वृषांक खनाल माझा एक्स बॉयफ्रेंड आहे.'

