MonkeyPox चा कम्युनिटी स्प्रेड! युरोपसह २० देशांत रुग्णसंख्येत वाढ, WHO नं दिला इशारा

MonkeyPox चा कम्युनिटी स्प्रेड! युरोपसह २० देशांत रुग्णसंख्येत वाढ, WHO नं दिला इशारा
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

कोरोनानंतर आता जगभरात मंकीपॉक्सचा (MonkeyPox) धोका निर्माण झाला आहे. जगभरात २० हून अधिक देशांत सुमारे २०० मंकीपॉक्सची रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी विभागाच्या संचालक डॉ. सिल्वी ब्रायंड (Dr. Sylvie Briand, WHO's director of pandemic and epidemic diseases) यांनी मंकीपॉक्सचा कम्युनिटी स्प्रेड होईल की नाही याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. "आम्हाला भिती आहे की मंकीपॉक्सचा कम्युनिटी स्प्रेड होईल. पण सध्यस्थितीत या जोखमीचे मूल्यांकन करणे खूप कठीण आहे." असे सिल्वी ब्रायंड यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, आफ्रिकेबाहेर मंकीपॉक्सचा उद्रेक कशामुळे झाला याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण याला व्हायरसमधील अनुवांशिक बदल जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा मिळालेली नाही.
"विषाणूचा पहिला क्रम दर्शवितो की हा स्ट्रेन विशिष्ट ठिकाणी आढळणाऱ्या स्ट्रेनपेक्षा वेगळा नाही. मंकीपॉक्सचा उद्रेक कदाचित मानवी वर्तनातील बदलामुळे झाला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, डब्ल्यूएचओच्या एका सल्लागाराने सांगितले होते की युरोप, अमेरिका, इस्राईल, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि बेल्जियमध्ये मंकीपॉक्सचा (MonkeyPox) उद्रेक झाला आहे. या देशांतील उद्रेक हा लैंगिक संबंधाशी जोडलेला आहे.

स्पेनमधील रुग्णसंख्या ९८ वर पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये १०६, पोर्तुगालमध्ये ७४ रुग्णांची नोंद झाली आहे. ब्रिटन, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा, अमेरिका आणि अन्य देशांतील डॉक्टरांनी असे म्हटले केले आहे की आजपर्यंतचे बहुतांश संक्रमण हे समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये झाले आहेत. पण शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की जर संक्रमण नियंत्रणात ठेवले नाही तर हा व्हायरस इतरांना संक्रमित करू शकतो.

गे सेक्समुळे मंकीपॉक्सचा फैलाव

गे सेक्समुळे मंकीपॉक्स पसरत असल्याशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्‍त केली आहे. युरोपमध्ये असा एक मोठा इव्हेंट झाला होता. त्यातून समलैंगिक पुरुषांमध्ये मंकीपॉक्सचे संक्रमण वेगाने पसरल्याचा दावा करण्यात आला आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स अतिशय दुर्मीळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळे होतो, त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. या विषाणूचा त्वचा, श्वासनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो.

त्यावर उपचार काय…

लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्यात यावा. दुय्यम बॅक्टरील संसर्ग असल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत. पुरेशा प्रमाणात द्रव्ये द्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही. पोषक आहार देण्यात यावा.

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना, अस्वस्थपणा यांचा समावेश होतो. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरीरावर डाग तसेच राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news