(PM Vishwakarma Yojana)
(PM Vishwakarma Yojana)

पीएम विश्वकर्मा योजनेस १७ सप्टेंबरपासून प्रारंभ

Published on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विश्वकर्मा जयंतीनिमित्त रविवारी (१७ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी पीएम विश्वकर्मा योजनेला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी पंतप्रधान मोदींचा वाढदिवसही आहे. परंपरागत व्यवसायातील कारागिरांना पाठिंबा देणे आणि त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणलेल्या योजनेवर केंद्र सरकार १३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. (PM Vishwakarma Yojana)

द्वारका भागातील यशोभूमी या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनासोबतच पीएम विश्वकर्मा योजनेलाही प्रारंभ होणार आहे. 'पीएम विश्वकर्मा' योजनेमध्ये अठरा हस्तकलांचा समावेश असेल. या योजनेमध्ये कारागिरांना कौशल्य विकासासाठी कर्जसहाय्य आणि प्रशिक्षण दिले जाईल. यात, सुतार, होडी बांधणी कारागीर, चिलखत बनवणारे, लोहार, हातोडी आणि अवजार संच बनवणारे,  कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट, चर्मकार (पादत्राणे कारागीर), गवंडी, टोपल्या, चटया, केरसुणी, काथ्याचे साहित्य बनविणारे कारागीर, पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे कारागीर, केश कर्तनकार, पुष्पहार, पुष्पगुच्छ बनवणारे कारागीर,परीट, शिंपी आणि मच्छिमारीसाठी जाळे विणणारे कारागीर यासारख्या पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. (PM Vishwakarma Yojana)

यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाणार आहे.  'पीएम विश्वकर्मा' योजनेला केंद्र सरकार कडून संपूर्ण निधी दिला जाईल. या योजनेंतर्गत, बायोमेट्रिक आधारे पीएम विश्वकर्मा पोर्टल वर कारागिरांची सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल. या योजनेत प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना १५ हजार रुपयांची साधनसामग्रीसाठीचा प्रोत्साहन निधी मिळेल. त्याचप्रमाणे पाच टक्के सवलतीच्या व्याजदरावर अर्थसहाय्याचा १ लाख रुपयांचा पहिला हप्त्ता आणि त्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज कारागिरांना मिळू शकेल. तसेच डिजिटल व्यवहार आणि विपणनासाठीही त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. (PM Vishwakarma Yojana)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news