

चंदीगड; वृत्तसंस्था : पंजाब दौर्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींच्या ( pm security breach ) चौकशीसाठी त्रिसदस्यीय केंद्रीय समिती शुक्रवारी फिरोजपूर येथे दाखल झाली असून, चौकशीला सुरुवात झाली आहे. पंजाब सरकारने पंतप्रधानांचा ताफा अडविल्यावरून 150 आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय समितीचे सदस्य सर्वात आधी पंतप्रधानांच्या ताफ्याला ताटकळावे लागले त्या ठिकाणावर पोहोचले. नंतर सीमा सुरक्षा दलाच्या फिरोजपूर शिबिरात आले. विभागीय पोलिस महासंचालक इंद्रबीर सिंग आणि पोलिस अधीक्षक हरमनदीपसिंग हंस यांना येथेच बोलावून त्यांची चौकशी केली. ( pm security breach )
वाहतूक ठप्प झालेल्या ठिकाणावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचार्यांचीही चौकशी केली जात आहे. पंजाब सरकारच्या वतीने पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अतिरिक्त पोलिस महासंचालक डी. नागेश्वरराव तसेच पंजाबचे कार्यकारी पोलिस महासंचालक सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. ( pm security breach )
दरम्यान, पंतप्रधानांचा ताफा अडविल्याप्रकरणी कुलगडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दीडशे जण असा संख्यात्मक उल्लेख असला, तरी एकाही आरोपीचे नाव अद्याप नमूद करण्यात आलेले नाही. प्रकरणाचे गांभीर्य पाहता राज्य सरकार लवकरच अटकेची कारवाई करेल, असे संकेत आहेत. याबाबत शेतकरी संघटनांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
समितीत 'आयबी', 'एसपीजी' अधिकारी ( pm security breach )
दिल्लीहून आलेल्या चौकशी समितीत 'आयबी'चे (इंटेलिजन्स ब्युरो) सहसंचालक बलबीर सिंग, सुरक्षा सचिव सुधीर कुमार सक्सेना आणि 'एसपीजी'चे (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) महासंचालक सुरेश हे सहभागी आहेत.
पंजाब समितीचा अहवाल
या प्रकरणाच्या चौकशीसाठी पंजाब राज्य सरकारनेही निवृत्त न्यायमूर्ती मेहताबसिंग गिल आणि राज्याचे गृह सचिव अनुराग वर्मा यांची समिती नेमली आहे. समितीने आपला पहिला अहवाल केंद्र सरकारला पाठविला आहे. पंजाबातील परिस्थितीबद्दलची माहिती केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना वेळोवेळी देण्यात आली होती, असे या अहवालात म्हटले आहे.