

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसमध्ये 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रीत केले आहे. या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मोठे विधान केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहे. या परिषदेस दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी निमंत्रीत केले आहे. 22-24 ऑगस्ट 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकाला भेट देत आहे.
तसेच, जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्यासाठीही मी उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेतून, मी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून 25 ऑगस्ट 2023 रोजी अथेन्स, ग्रीस येथे जाणार आहे. या प्राचीन भूमीला माझी ही पहिलीच भेट असेल. 40 वर्षांनंतर ग्रीसला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान होण्याचा मान मला मिळाल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गला रवाना झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून ते 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेला भेट देत आहेत.