पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या मतदारसंघातून मिळालेल्या 'फीडबॅक'च्या आधारे रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपने राष्ट्रीय महासचिव सुनील बंसल, विनोद तावडे तसेच तरुण चुघ यांना या सभांच्या तयारीची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती समोर आली आहे. या लोकसभा मतदार संघांना वेगवेगळ्या क्लस्टरमध्ये विभाजित करण्यात आले आहे. प्रत्येक क्लस्टर मध्ये ४ लोकसभा मतदारसंघ आहेत. जवळपास ४५ जागा मिळवण्याचे लक्ष भाजपचे आहे.या अनुषंगाने पंतप्रधान ५५ सभा करतील.या सभा केंद्र अथवा भाजप शासित राज्य सरकारांच्या योजनांच्या शिलान्यास अथवा उदघाटन कार्यक्रमाच्या स्वरुपात आयोजित केल्या जातील. यासह १६० मतदार संघांना दोन वेगवेगळ्या भागात विभागण्यात आले आहे. नड्डा अगोदर ८० मतदार संघात सभा करतील तर उर्वरित ८० मतदार संघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभा घेतील. पहिल्या टप्प्यातील प्रचार अभियान पुर्ण झाल्यानंतर पक्ष दुसऱ्या टप्प्याचा प्रचार अभियान सुरू करेल. यात देशातील उर्वरित ३८३ मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पक्षाचे इतर बडे नेत्यांच्या सभा, रॅली, रोड शो चे आयोजन केले जाईल.