

पिंपरी: नवरात्र म्हटले की, दांडिया, गरबा हवाच असतो. नवरात्र उत्सवात खेळला जाणाऱ्या दांडिया हा तालाच्या, सुरांचा एक अनोखा अविष्कार आहे. मूळचा गुजरातचा असणारा दांडीया हा आता महाराष्ट्रातही चांगलाच रुजला आहे.
नवरात्र म्हटले की भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम ठरलेले आहेत. त्यामुळे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शहरापरिसरात दांडिया, रास, गरबाचे सराव अंतिम टप्प्यात आले आहेत. आता घटस्थापनेपासून दांडियाच्या तालावर थिरकायला तरूणाई सज्ज झाली आहे. (Latest Pimpari chinchwad News)
शहरामध्ये जवळपास एक महिना गरबा आणि दांडियाच्या प्रशिक्षणाचे क्लास सुरू होते. हौसेला मौल नाही याप्रमाणे यामध्ये अगदी लहान मुलींपासून ते मध्यमवयीन देखील व्यक्तींचा देखील सहभाग होता. आता सरावाचे दिवस संपले असून येत्या सोमवारपासून दांड्यािचा प्रत्यक्ष आनंद लुटण्याची उत्सुकता लागली आहे.
धार्मिकता, पावित्र्य आणि वतवैकल्याच्या नवरात्री दांडीया-गरब्यामुळे आनंदोत्सवात न्हावून जाणार आहे. येत्या दोन दिवसात शिगेला पोहोचणाऱ्या तरुणाईच्या जल्लोषाचं वैशिष्ट्य इव्हेण्ट्स, स्पॉन्सर्स, भरघोस बक्षिसे अशा कितीतरी गोष्टी. अवघ्या तरुणाईला साद घालणारा हा उत्सव आता भरात आलाय. त्यात कॉलेज गोईंग मुलामुलींची शनिवार व रविवारसाठी चाललेली जय्यत तयारी तर विचारायलाच नको.
शहरासह उपनगरांतील चौक न चौक आणि कितीतरी लॉन्समध्ये दांडीया-गरबा, ऑर्केस्ट्रा डीजे सिस्टम्स, रंगबिरंगी रोषणाई, त्याला साजेसं फ्लोअरिंग, भव्य व्यासपीठ अशा दिमाखदार आयोजनामुळे तरुणाईचा उत्साहदेखील चांगलाच दूणावलाय.
दांडिया-गरब्याचं प्रशिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींचे ग््रुाप्स लॉन्स अन् मैदानांच्या ठिकाणी येतात. लगेचच जॉईन होतात आणि बघता बघता उपस्थितांचेही पाय फेर धरू लागतात. बहुतांश ठिकाणी गरबा-दांडीयासाठी ‘ड्रेसकोड’ निश्चित करण्यात आलाय. या बदलत्या प्रवाहात एक गोष्ट मात्र आजही तशीच आहे, ती म्हणजे या उत्सवाला लाभलेली जुन्या गाण्यांची साथ.