YCM Hospital Police Attack: वायसीएम रुग्णालयात पोलिस हवालदारावर जीवघेणा हल्ला; तिघे ताब्यात

डॉक्टरांना शिवीगाळ करून गोंधळ घालणाऱ्यांना रोखल्याने हल्ला; लोखंडी कड्याने मारल्याने हवालदाराच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत
YCM Hospital
YCM HospitalPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अरेरावी करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवार (दि. २४) पहाटे घडली. या प्रकरणी चिंचवडमधील बड्या राजकीय नेत्याच्या तीन कार्यकर्त्यांना संत तुकारामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

YCM Hospital
Pimpri Chinchwad AI Traffic Signals: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी फुटणार? आता AI सिग्नलद्वारे वाहतुकीचे नियंत्रण

वैभव सुभाष साळुंखे (३२, रा. आदर्शनगर, सांगवी), कुशाल नैना गोयल (२८, रा. पवनानगर, पिंपळे गुरव) व सोहेल शब्बीर शेख (२७, रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.

YCM Hospital
Thergaon Natural drain: थेरगावात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्याचा आरोप; बांधकाम परवानगीवर प्रश्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार अमोल शिंदे (३२) आणि हवालदार डगवार हे शनिवार (दि. २४) रात्री ‘वायसीएम’ रुग्णालयात बंदोबस्तासाठी तैनात होते. पहाटे साडे चारच्या सुमारास संशयित आरोपी वैभव साळुंखे, कुशाल गोयल आणि सोहेल शेख हे तिघे त्यांचा मित्र कौस्तुभ गुप्ता याच्या उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात आले.

YCM Hospital
Pimpri Crime News: इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ डिलीट केल्याने विद्यार्थिनीवर चाकूहल्ला; म्हाळुंगेतील घटना

चौकीत घुसून गळा आवळला

पोलिसांच्या मदतीसाठी पोलिस हवालदार शिंदे हे रुग्णालयातील पोलिस चौकीमध्ये गेले असता, संशयित वैभव साळुंखे हा त्यांच्या पाठीमागून चौकीत घुसला. तुझ्यात किती दम आहे ते बघतोच, तुला जिवंत सोडत नाही, अशी धमकी देत शिंदे यांचा गळा दाबला. एवढ्यावरच न थांबता संशयित साळुंखे याने हातातील जाड लोखंडी कडे पंजात धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने शिंदे यांच्या तोंडावर जोरात मारले. या हल्ल्यात शिंदे यांच्या डाव्या डोळ्यावर आणि कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. त्याच वेळी इतर दोन आरोपी कुशाल गोयल आणि सोहेल शेख यांनीही शिवीगाळ करत, तू बाहेर भेट, तुला संपवून टाकतो अशी धमकी दिली.

YCM Hospital
Vijay Suryawanshi: महापालिकेत निलंबनाचा धडाका! विजय सूर्यवंशींच्या ७ महिन्यांत ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

डॉक्टरांना शिवीगाळ अन् पोलिसांवर हल्ला

वैद्यकीय अधिकारी रुग्णावर उपचार करत असताना आरोपींनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आरडाओरडा सुरू केला आणि डॉक्टरांना अरेरावीची भाषा वापरली. बंदोबस्तावर असलेल्या अमोल शिंदे आणि डगवार यांनी आरोपींना, गोंधळ घालू नका, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र या तिघांनी पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांच्या शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news