‌YCM doctor disciplinary action: ‘वायसीएम‌’मधील डॉक्टरवर कारवाई; असभ्य वर्तनामुळे विभागीय चौकशी व बदली

आयुक्त शेखर सिंह यांचे आदेश
YCM doctor disciplinary action
‘वायसीएम‌’मधील डॉक्टरवर कारवाईPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील एक फिजिशियन डॉक्टर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासह इतर डॉक्टरांना अत्यंत असभ्य भाषा वापरुन बोलतात. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई केली आहे. तसेच, त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून, त्यांची बदली भोसरी रुग्णालयात करण्यात आली आहे.  (Latest Pimpari chinchwad News)

डॉ. विनायक पाटील असे संबंधित डॉक्टराचे नाव आहे. रुग्णालयात एका रुग्णाला मेडिसीन विभागाचे डॉ. निरंजन पाठक यांच्या युनिटमध्ये दाखल केले. उपचाराबद्दल माहिती न घेता, हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसताना पाटील यांनी रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेचे कनिष्ठ निवासी डॉ. नीतेश पांडेगळे यांना रुग्णाला बाहेरुन औषधे आणायला का सांगितले यावरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, त्या रुग्णाने आपणांस कोणत्याही डॉक्टरांनी बाहेरून औषधे आणण्यास सांगितले नसल्याचा जबाब लिहून दिला आहे.

YCM doctor disciplinary action
Ladki Bahin Yojna e-KYC: ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींची दमछाक; कधी सर्व्हर डाऊन तर कधी नेटवर्कची समस्या

या प्रकरणानंतर डॉ. पांडेगळे यांनी वायसीएम रुग्णालयाच्या वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली. तक्रारीनुसार विभागस्तरावरुन डॉ. पाटील यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला. डॉ. पाटील यांनी खुलासा सादर केला. मात्र, त्यांनी खुलासा करताना अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, विभागफ.प्रमुख डॉ. प्रवीण सोनी, डॉ. मारुती गायकवाड यांच्याविषयी असभ्य भाषा वापरली. ती भाषा शिष्टाचाराशी अनुसरुन नव्हती. त्यानंतर मेडिसीन विभागप्रमुखांनी वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. डॉ. पाटील यांचे वर्तन अशोभनीय व रुग्णालयीन सेवेत अडथळा निर्माण करणारे आहे. त्यांच्या अशा आक्रमक वर्तनाने वायसीएम रुग्णालयातील सर्व डॉक्टरांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले.

YCM doctor disciplinary action
Women Sanitation Workers Pimpri Chinchwad: शहर स्वच्छतेत महिला कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय ठसा!

रुग्णसेवा महत्त्वपूर्ण सेवा असून, रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने वागणे अभिप्रेत व आवश्यक आहे. मात्र, पाटील यांनी तसे न करता वैद्यकीय सेवेत असताना वर्तणूक नियमाचा भंग करून शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल अशा स्वरुपाचे गैरवर्तन केले. यामुळे आयुक्त सिंह यांनी पाटील यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाटील यांची वायसीएम रुग्णालयातून भोसरी रुग्णालयात बदली केली आहे.

YCM doctor disciplinary action
Synthetic Intelligence | कृत्रिम बुद्धिमत्तेनंतर (AI) आता ‘सिंथेटिक इंटेलिजेन्स’ची (SI) चर्चा

राजकीय वरदहस्त ?

डॉ. विनायक पाटील हे महापालिका नोकरीत असूनही विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराचे व्हिडीओ, माहितीपत्रके, प्रचार पत्रके, भाषणे वारंवार सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यातून ते संबंधित पक्षाचे असल्याचे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news