Wrong Road Signboard: प्रशासनाचा अजब कारभार; अंतर्गत रस्त्यावरील चुकीच्या नामफलकामुळे नागरिकांत संभ्रम

प्रभाग क्रमांक ३१ मधील अंतर्गत रस्त्यावर चक्क चुकीचा फलक लावण्यात आल्याने नागरिक मोठ्या संभ्रमात पडले आहेत.
Wrong Road Signboard
Wrong Road SignboardPudahri
Published on
Updated on

पिंपळे गुरव: महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने नामफलक लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु प्रशासनाचा निष्काळजीपणा पिंपळे गुरवमध्ये समोर आला आहे. येथील प्रभाग क्रमांक ३१ मधील अंतर्गत रस्त्यावर चक्क चुकीचा फलक लावण्यात आल्याने नागरिक मोठ्या संभ्रमात पडले आहेत.

पिंपळे गुरवमधील प्रभाग क्रमांक ३१ मधील रामनगर, गजानननगर परिसरात सुमारे तीन आठवड्यांपूर्वी महापालिकेचा लोगो असलेला एक नामफलक अंतर्गत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आला.

Wrong Road Signboard
Vallabhnagar Underpass: वल्लभनगर भुयारी मार्ग देतोय अपघाताला निमंत्रण

गेल्या ३० वर्षांपासून हा रस्ता 'गजानननगर, गल्ली नंबर २' या नावाने परिचित आहे. मात्र, महापालिकेने या फलकावर 'गल्ली नंबर ४' असा उल्लेख केला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे या भागात येणाऱ्या व्यक्तींना पत्ता शोधताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अवघ्या तीन आठवड्यांत फलक कोलमडला

चुकीच्या नावाचा संभ्रम कमी होता की काय, म्हणून की प्रशासनाचा आणखी एक गलथानपणा समोर आला आहे. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी बसवलेला हा फलक आता कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचला आहे.

Wrong Road Signboard
Pimpri News: ई-ऑफिस ठप्पचा बांधकाम व्यावसायिकांना फटका

त्यामुळे महापालिकेने केलेल्या या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत स्थानिक नागरिकांमधून संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हा चुकीचा फलक हटवावा आणि त्या जागी मजबूत स्थितीत 'गल्ली नंबर २' चा फलक उभारावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गजानननगरमध्ये आम्ही गेली तीस वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वी नव्याने उभारण्यात आलेला फलक येता-जाता नजरेस पडतो, त्यावर गल्ली नंबर २ ऐवजी गल्ली नंबर ४ असे लिहिले आहे. यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होत असल्याने आम्ही याबाबतची माहिती संबंधित प्रशासनाला दिली आहे.

- तृषा कुलकर्णी, स्थानिक रहिवासी.

याबाबतची माहिती मला नुकतीच मिळाली आहे. सध्या सर्वजण एसआयआरच्या कामकाजात व्यस्त आहेत. तसेच स्थापत्य विभागातील हे काम करणाऱ्या कंत्राटदाराची मुदत संपली आहे. तरीदेखील यावर काय मार्ग काढता येईल ते पाहून हा फलक लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन.

- धनश्री हांडे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य विभाग), 'ह' क्षेत्रीय कार्यालय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news