Ashadhi Wari 2025: पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

विविध मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार असून, काही मार्गांवर पूर्णतः बंदी लागू करण्यात आली
pcmc news
पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील पर्यायी मार्ग Pudhari
Published on
Updated on

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवार (दि. 19) जून रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार असून, या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागातर्फे विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. 17 ते 20 जून या कालावधीत विविध मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार असून, काही मार्गांवर पूर्णतः बंदी लागू करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.

हा आहे पालखी मार्ग

आजोळघर, आळंदी - नगर परिषद चौक - देहूफाटा - चर्‍होली फाटा - अलंकापुरम चौक - थोरल्या पादुका मंदिर (विसावा) - मॅग्झिन चौक (विसावा) - विठ्ठल रुक्मिणी चौक, दिघी - बोपखेल फाटा - विश्रांतवाडी, पुणे

नागरिकांनी भारतमाता चौक - पांजरपोळ चौक - अलंकापुरम चौक किंवा शेल पिंपळगाव - कोयाळी - मरकळगाव मार्गांचा पर्यायी वापर करावा.

pcmc news
Ashadhi Wari 2025: अवघा होय पांडुरंग! जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

17 ते 20 जूनदरम्यान आळंदी शहरात सर्व वाहनांना प्रवेशबंदी

चर्‍होली फाटा, डुडुळगाव जकात नाका, केळगाव चौक (बापदेव चौक), इंद्रायणी हॉस्पिटल, विश्रांतवाडी, धानोरी फाटा (पीसीएस चौक) या ठिकाणांहून आळंदीमध्ये येणारी वाहतूक बंद. हवालदार वस्ती ते तळेकर पाटील चौक, देहूफाटामार्गे आळंदी सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी.

एकेरी मार्ग व्यवस्था (17 ते 19 जून)

हवालदार वस्ती - तळेकर पाटील चौक - आदित्य इंटरनॅशनल स्कूल - डुडुळगाव चौक - चाकण / मोशीकडे एकेरी वाहतूक, भारतामाता चौक - वाय जंक्शन मोशी चौक मार्गही एकेरी करण्यात आला आहे. मोशीकडून हवालदार वस्तीकडे किंवा उलट दिशेने जाण्यास बंदी.

pcmc news
Alandi: नांदेडच्या भक्ताकडून माउलींना 1 कोटीचा सोन्याचा मुकुट अर्पण

20 जून रोजी पालखी मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी

  • विश्रांतवाडी - बोपखेल - आळंदी,

  • मरकळ - चर्‍होली - आळंदी,

  • मोशी चौक - देहूफाटा - आळंदी,

  • आळंदी फाटा चाकण, चिंबळी फाटा,

  • वडगाव घेणंद - विश्रांतवाडीमार्गे आळंदी,

  • पांजरपोळ चौक - अलंकापुरम - आळंदी,

  • भोसरी - मॅग्झिन चौक, दिघी, बोपखेलमार्गे आळंदी

या सर्व मार्गांवरील वाहनांची वाहतूक पालखी मार्गाला मिळत असल्यामुळे पूर्णतः बंद राहणार आहे. तसेच, तुळापूरकडून येणार्‍या जड वाहनांना मरकळ गावातून पुढे आळंदीकडे येण्यास बंदी असून, त्यांना कोयाळी शेल पिंपळगावमार्गे वळविण्यात येणार आहे.

जड-अवजड वाहनांना बंदी

(17 ते 19 जूनदरम्यान)

  • चाकण ते आळंदी (आळंदी फाटा, चाकण)

  • चिंबळी ते आळंदी (चिंबळी फाटा, चाकण)

  • शेल पिंपळगाव, वडगाव घेणंद ते आळंदी (कोयाळी कमान)

  • मरकळ ते आळंदी (धानोरी फाटा)

  • भारतमाता चौक ते आळंदी (मोशी)

  • मोशी चौक ते आळंदी

  • विश्रांतीवड ते आळंदी (दिघी मॅग्झिन चौक)

  • आळंदी परिसरातील पार्किंग व्यवस्था

  • आळंदी-देहू रोडवरील तळेकर पाटील चौक (दक्षिण व उत्तर)

  • ज्ञानविलास कॉलेज, डुडुळगाव जकात नाका

  • बोपदेव चौक

  • इंद्रायणी हॉस्पिटलसमोर (चाकणरोड)

  • विश्रांतवड-वडगावरोड

  • मुक्ताई मंगल कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news