

पिंपरी- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी शहरामध्ये आगमन होणार आहे. दरम्यान, पालखी मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले असल्याचे दिसून आले. देहू ते निगडी या दरम्यान पालखी मार्गावरती रस्त्याच्या कडेला तसेच, मधोमध पाणी साचले होते.
निगडी येथील महापालिकेच्या आणि पोलीस मदत केंद्राच्या कक्षा समोरच पाण्याचे पाट वाहत आहे. त्यामुळे या पाण्यातून वाट काढत वारकऱ्यांना पुढे जावे लागते. पाण्याबरोबर चिखल देखील वाद आल्याने वारकऱ्यांचे कपडे खराब होत आहेत. त्यामुळे अखेर वारकऱ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या पायाला अडकवल्या होत्या. (Latest Pimpri News)
दरम्यान या वाहत्या पाण्यामध्ये कचरा, वाटप झालेल्या केळीची साले, रिकामे कप, बाटल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून महापालिकेच्या कक्षसमोर आल्या होत्या. त्यामुळे येथे तैनात असलेल्या आरोग्य विभागाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली.
आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले की, पावसाच्या प्रमाणाचे पाणी वाहत या ठिकाणी आले आहे. तरी, या ठिकाणी चिखल होणे म्हणून काळजी घेण्यात येत आहे. मार्गाच्या बाजूला असलेला कचरा उचलण्यात आलेला आहे