

Pimpri Chinchwad Municipal Corporation Latest News
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पिंपरी-चिंचवड महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. पीसीएमसी पॉटहोल मॅनेजमेंट हे नावीन्यपूर्ण अॅप असून, नागरिकांना या अॅपद्वारे शहरातील कोणत्याही भागांतील रस्त्यांवरील खड्ड्याची तक्रार नोंदवता येणार आहे. त्याद्वारे तक्रार करण्यासाठी महापालिकेच्या अॅपमध्ये आणखी एका अॅपची भर पडली आहे.
महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी सुरू आहे. पावसाळ्यामध्ये दरवर्षी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात. यासाठी महापालिकेने पॉटहोल अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे नागरिकांना खड्ड्यांची तक्रार सहज नोंदविता येणार आहे. त्या तक्रारीवर महापालिकेने काय उपाययोजना केली याची माहितीही मिळणार आहे.
नागरिकांना अॅपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी प्रथम पॉटहोल अॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यासाठी प्रथम ते अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर नागरिक खड्ड्यांचे छायाचित्र काढून त्याच्या स्थानासह (जिओ लोकेशन) ते अपलोड करू शकतात. ही माहिती आपोआप संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना पाठवली जाईल. याचवेळी ती माहिती वरिष्ठ अधिकार्यांनाही पाठवली जाईल. तक्रारी नोंदवल्यानंतर तिचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकार्यांकडे दिली जाईल.
तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर त्या भागातील वरिष्ठ अधिकारी यांना ई-मेल व संदेश पाठवण्यात येईल. एखादी तक्रार कनिष्ठ अभियंता यांच्या अधीन नसल्यास ती महापालिकेच्या ज्या विभागाशी आहे, त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. तक्रारीचे निराकरण संबंधित विभाग किंवा अभियंता यांनी केल्यानंतर ती तक्रार अॅपमध्ये बंद केली जाईल. तक्रारदार नागरिकास छायाचित्रासह निराकरणाची माहिती ई-मेल, संदेशाद्वारे कळवली जाणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. पीसीएमसी पॉटहोल मॅनेजमेंट हे नावीन्यपूर्ण अॅप असून, नागरिकांना या अॅपद्वारे शहरातील कोणत्याही भागांतील रस्त्यांवरील खड्ड्याची तक्रार नोंदवता येणार आहे. त्याद्वारे तक्रार करण्यासाठी महापालिकेच्या अॅपमध्ये आणखी एका अॅपची भर पडली आहे.
महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी सुरू आहे. पावसाळ्यामध्ये दरवर्षी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात. यासाठी महापालिकेने पॉटहोल अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे नागरिकांना खड्ड्यांची तक्रार सहज नोंदविता येणार आहे. त्या तक्रारीवर महापालिकेने काय उपाययोजना केली याची माहितीही मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवडशहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार सहज करता यावी, यासाठी नवीन अॅप सुरू करण्यात आले आहे. त्यावर नागरिक खड्ड्यांबाबत तक्रार करू शकतात, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
मोबाईलमध्ये लोकेशन सर्व्हिसेस ऑन करा. झूम जीपीआय लोकेशनवर क्लिक करून सध्याचे लोकेशन पाहा. नकाशावर खड्ड्याचे स्थान निवडा. जवळचा ओळखण्याजोगा पत्ता, संदर्भ द्या. समस्या प्रकार निवडा (उदा. कमी खोल खड्डा, खोल खड्डा, चेंबर डॅमेज, युटिलिटी ट्रैच डॅमेज आदी) अंदाजे लांबी व रुंदी (मीटरमध्ये) प्रविष्ट करा. खड्ड्याचे स्पष्ट छायाचित्र अपलोड करा. त्यानंतर तक्रार सबमिट करा. आपल्याला एक युनिक तक्रार क्रमांक दिला जाईल. ई-मेलद्वारे ट्रॅकिंग लिंकसह पुष्टीकरण मिळेल. ही तक्रार संबंधित महापालिकेच्या अभियंत्याकडे पाठवली जाईल. दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतरचे छायाचित्र पूर्ण झाल्याचा अहवाल आपल्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठवला जाणार आहे.