

पिंपरी: हिंजवडी परिसरातील रस्ते रुंदीकरणाबाबत गेल्या काही दिवसापासून हिंजवडी, मान ग्रामस्थांनी विरोध केला होता. ३६ मीटर एवजी तो कमी करावा ,अन्यथा या विरोधात आक्रमक झाले होते. तूर्तास, या मागणी मान्य केली असून, त्यात बदल करण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मान्य केले.
हिंजवडी परिसरातील रस्ते ३६ मीटर करण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांचा आग्रह होता. त्याबाबत पी एम आर डी ए वतीने सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आले होते. मात्र या स्थानिक ग्रामस्थ मात्र आक्रमक पाहण्यास मिळाले होते. हिंजवडी आणि मान ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसभा घेऊन विरोध दर्शवला होता. तसेच, वेळ आल्यास याबाबत आक्रमक भूमिका घेऊन अशी देखील ठराव केला होता. (Latest Pimpri News)
दरम्यान त्यावरती आता पालकमंत्री यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन वाकड ते शिवाजी चौक हा रस्ता पूर्वीप्रमाणे 30 मीटर तसेच, मान गावठाण मधील रस्ता 24 मीटर करण्याबाबत मान्य केले आहे. त्याबाबतची माहिती स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी दिली. तसेच, आमचे म्हणणे ऐकून घेतल्या बाबत आणि ग्रामस्थांच्या लढायला अखेर यश आले असे हिंजवडीचे सरपंच यांनी सांगितले.