Vallabhnagar Illegal Parking: वल्लभनगरला अनधिकृत पार्किंगचा विळखा; वाहतूक प्रशासनाचे दुर्लक्ष

पादचारी, वाहनचालक त्रस्त
Vallabhnagar Illegal Parking
वल्लभनगरला अनधिकृत पार्किंगचा विळखा; वाहतूक प्रशासनाचे दुर्लक्षPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: पिंपरी चिंचवड परिसरात महापालिकेच्या वतीने प्रशस्त रस्ते चौक उभारण्यात आले आहेत. तरीसुद्धा शहरांमध्ये पार्किंगची समस्या जैसे थे आहे. वल्लभनगर एसटी स्टँड शेजारी मुख्य रस्त्याच्या कडेने चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे पार्क केली जात आहेत.

या बेकायदेशीर पार्किंगमुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेवर ताण आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी रहदारीला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावरील पार्किंगमुळे रस्ता जाम होत असल्यामुळे त्याचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  (Latest Pimpri News)

Vallabhnagar Illegal Parking
Fake Apps: आता गुगल, अ‍ॅपल स्टोअरवरही फसवे अ‍ॅप! डाऊनलोड करताना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

या रस्त्याचा वापर एसटी, पीएमपीएमएल बसेस, तसेच खासगी वाहनचालक मोठ्या प्रमाणावर करत असल्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने उभा राहिल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, वाहनांची कोंडी निर्माण होत आहे.

स्थानिक नागरिक, दुकानदार आणि प्रवासी यांच्याकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असून, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. महापालिकेने या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी आणि बेकायदेशीर पार्किंग करणार्‍या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Vallabhnagar Illegal Parking
Rahuri News: ‘त्या’ ठेकेदाराकडून विद्यापीठाची फसवणूक; बांधकामातील अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर

रोडवरील खासगी वाहनांवर सकाळ, संध्याकाळ पेट्रोलिंग पाठवून 122 प्रमाणे कारवाई करत असतो. वाहनचालकांनी वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन अधिकृत पार्किंगचाच वापर करावा.

- वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग.

बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघाताचा धोका संभवतो. रात्री पार्किंगमध्ये उभा असलेल्या वाहनांमध्ये बेकायदेशीर कृत्ये केली जातात. वाहतूक विभागाने याची दखल घेऊन कारवाई करावी.

- राजू आवळे, सामाजिक कार्यकर्ता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news