Nagar Panchayat Election: वडगाव नगरपंचायत निवडणूक; नागरिकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – डॉ. प्रवीण निकम

यंत्रणा सज्ज; 24 मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी, फ्लेक्स-होर्डिंग्ज काढण्यात आले, उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून
Nagar Panchayat Election
Nagar Panchayat ElectionPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. उमेदवार व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून या निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. (Latest Pimpri chinchwad News)

Nagar Panchayat Election
Duplicate Voters: बोगस मतदान रोखण्यासाठी महापालिका सज्ज; दुबार मतदारांना दोन स्टारची खूण

नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, दि. 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दि. 17 पर्यंत अखेरची मुदत असून, दि. 18 रोजी छाननी होणार आहे. तर 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. दरम्यान, नामनिर्देशन पत्र स्वीकारणे छाननी प्रक्रिया तसेच मतमोजणी प्रक्रिया नगरपंचायत कार्यालयातच होणार असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले.

Nagar Panchayat Election
Municipal Election Candidates: आचारसंहिता लागली, पण उमेदवार अजूनही अनिश्चित!

मतदान प्रक्रियेसाठी 24 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये केशवनगर जिल्हा परिषद शाळा, कातवी येथील जिल्हा परिषद शाळा, पंचायत समिती आवारातील जिल्हा परिषद शाळा व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, न्यू इंग्लिश स्कूल शाळा, रमेश कुमार सहानी इंग्लिश स्कूल व पोतदार इंग्लिश स्कूल या ठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Nagar Panchayat Election
Farmers Protest: टीपी योजनांवर शेतकऱ्यांचा वाढता विरोध; पीएमआरडीएचा पुढाकार ठरला निष्फळ

उमेदवारी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे असून, मूळ प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. अर्जासोबत शपथपत्र, स्वयंघोषणा पत्र, थकबाकी नसलेला दाखला, गुन्हेगारी नसलेला दाखला, जन्म तारखेचा पुरावा, मालमत्तेचे विवरण, शौचालय असल्याचा दाखला, नगरपंचायत ठेकेदार नसल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक खर्चासाठी बँकेचे खाते, आरक्षित जागेसाठी जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र व ते नसल्यास वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची प्रत आदी कागदपत्रे जोडून उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन डॉ. निकम यांनी केले.

Nagar Panchayat Election
Pimpari Chinchwad Crime | गावात जमिनीचा वाद ; साहिल बारणेने मागवले पिस्तूल?

24 होर्डिंग्ज, 161 फ्लेक्स काढले

राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू केली असून, आचारसंहितेची अंमलबजावणी म्हणून शहरातील सुमारे 24 होर्डिंग्ज, 161 फ्लेक्स काढून टाकण्यात आले असून, नामफलक, पाट्या, बोर्ड झाकण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांकडून आचारसंहिता काळात पत्रके वाटणे, भेटवस्तू वाटणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्धी करून प्रलोभने दाखवणे यावर निवडणूक यंत्रणेचे लक्ष असून त्यासाठी मीडिया सेलची नेमणूक करण्यात आलेली आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास सबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये धरण्यात येणार असल्याचेही डॉ. निकम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news