PCMC Dripline Theft: अर्बन स्ट्रीटवरील ड्रीपलाईन-केबल चोरी; झाडांना पुन्हा टॅंकरवरच ‘पाणी’

सुशोभीकरण प्रकल्पावर चोरट्यांचा डोळा; ड्रीप बंद, बोअरवेल वायर चोरी, नागरिकांत नाराजी—पोलिस व प्रशासनाकडून वाढीव सुरक्षा आश्वासन
PCMC Dripline Theft
PCMC Dripline TheftPudhari
Published on
Updated on

पिंपळे निलख : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अर्बन स्ट्रीट डिजाईनच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण, पदपथ विस्तार, सायकल ट्रॅक तसेच वाहनांना पार्किंगसाठी जागा आणि रस्त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी रस्ता दुभाजक आणि पदपथाच्या बाजूने झाडे, बगीचा उभारण्यात आला आहे.

PCMC Dripline Theft
Ancient Hanuman Idol Bhadalwadi: बधलवाडीतील मंदिर उत्खननात उघडकीस आली प्राचीन हनुमान मूर्ती

बधलवाडीतील मंदिर उत्खननात उघडकीस आली प्राचीन हनुमान मूर्तीया झाडांचे संगोपन, त्यांना दररोज पाणी देण्यासाठी ड्रीप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु, चोरट्यांनी ही ड्रीप लाईनच तोडून तर काही ठिकाणी चोरून नेली आहे. यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

PCMC Dripline Theft
Robotic Rescue Machine PCMC: नदीत बचावासाठी 15 लाखांचे रोबोटिक मशिन; अग्निशमन विभागाचा विरोध झुगारला?

जगताप डेअरी चौक ते सांगवी फाटा बीआरटी रोडलगत अर्बन स्ट्रीट डिजाईन उपक्रमांतर्गत रस्त्याच्या बाजूला लावलेली झाडे, बगीचा उभारला आहे. त्यांना पाणी देण्यासाठी ड्रीप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु, ड्रिप पाईपलाइन तुटकी, अस्ताव्यस्त आणि काही ठिकाणी चोरीला गेली आहे. ड्रिप सिंचनासाठी बसवलेल्या केबल तांब्याची असल्याने वारंवार चोरीला जात असल्याचे उद्यान विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे ड्रिप बंद असून येथील झाडांना टॅंकरने पाणी देण्याची वेळ आली आहे.

PCMC Dripline Theft
School Transport Safety Pimpri: शालेय बसची बेफिकीर धाव; 62.7% वाहनचालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

बीआरटी मार्गालगत लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी बोअरवेल आहे. परंतु, पंप चालवण्यासाठी लागणारी वायरची चोरी होत आहे. त्यामुळे ड्रिप लाईन बंद आहे. देखभालीचे कंत्राट बीव्हीजीकडे आहे. अनियमितता दिसली की त्यांना सांगून काम करून घेण्यात येईल.

संजीव राक्षे, उद्यान देखभाल विभाग, ड क्षेत्रीय कार्यालय

आम्ही लगेच त्या भागाची पाहणी करून दुरुस्ती सुरू करतो. गरज असेल तेथे नवीन ड्रीप बसवतो. चोरी झालेल्या ठिकाणी रेकी करून माहिती उद्यान विभागाला देतो. आवश्यक सुधारणा तातडीने केली जाईल.

विनोद पवार, उद्यान विभागीय सुपरवायझर, बीव्हीजी.

विशालनगर, पिंपळे निलख परिसरात रात्री एक आणि दिवसा एक मार्शल आधीच देण्यात आले आहेत. रक्षक चौकाकडे आणखी एक मार्शल वाढवत आहोत. चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक पेट्रोलिंग राउंड करण्याचे आदेश दिले जातील.

संदीप खलाटे, पोलिस उपनिरीक्षक, सांगवी.

येथील झाडांना पाणी देण्यासाठी बोअरवेल आहे. तसेच ड्रीप सिंचन आहे. तरीही रोज टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चोरी थांबवण्याची जबाबदारी कोणाची? प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे.

सचिन साठे, भाजपा

नागरिकांची मागणी

ड्रीप दुरुस्त करून पूर्णपणे कार्यान्वित करा

चोरी रोखण्यासाठी सुरक्षा व पोलिस पेट्रोलिंग वाढवा

टॅंकरवरील अवलंबित्व तातडीने कमी करा

कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news