Pimpri Chinchwad News: धावत्या पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले; सात प्रवासी जखमी

चिंचवड स्टेशनजवळ पुणे-मुंबई महामार्गावरील घटना
Pimpri Chinchwad News
धावत्या पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले; सात प्रवासी जखमीPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्टेशनजवळ पुणे-मुंबई महामार्गावर बुधवारी (दि. 2) सकाळच्या सुमारास धावत्या पीएमपी बसवर झाड कोसळले. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने दुर्घटना टळली.

महापालिकेकडून पिंपरी ते आकुर्डीदरम्यान अर्बन स्ट्रीट प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. चिंचवड स्टेशनलगतच्या खासगी बांधकाम प्रकल्पाच्या परिसरात असलेले झाड सततच्या पावसामुळे आणि मुळे उघडी पडल्यामुळे कलले होते. बुधवारी सकाळी हे झाड धावत्या बसवर उन्मळून पडले. बस चिंचवड स्टेशनहून निगडीच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. (Latest Pimpri News)

Pimpri Chinchwad News
Pimpri-Chinchwad DP Issue: पिंपरी-चिंचवड ‘डीपी’चा मुद्दा अधिवेशनात

या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. झाड बसच्या छतावर कोसळल्याने सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दल आणि पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

संपूर्ण रस्त्यावर झाड आडवे पडल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी झाड तोडून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या प्रकारामुळे रस्त्यालगतच्या झाडांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्मळून पडलेले झाड खासगी भूखंडाच्या सीमाभिंतीच्या आत असून पालिकेच्या खोदकामामुळे ते कमकुवत झाले, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, पालिकेने आरोपाचे खंडन केले आहे.

खासगी जागेतील हे झाड सीमाभिंतीच्या आत आहे. झाड पडण्यामागे महापालिकेच्या खोदकामाचा संबंध नाही. खोदकाम बाजूला करण्यात आले होते.

- बापू गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news